नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. १५६८
संसारापासूनि कैसे सोडविशी । न कळे हृषीकेशी काय जालो ।करिता न सरे अधिक वाढ पाही ।
तृष्णा देशधडी केलो । भक्तीभजनभाव यांसी नाही ठाव । चरणी तुझ्या अंतरलों।
मागे पुढे रीग न पुरे चि पाहाता । अवघा अवघी वेष्टिलो ॥१॥
आता माझी लाज राखे नारायणा । हीन दीन लीन याचकाची ।
करिता न कळे काही असतील गुण दोष । करी होळी संचिताची ॥धृपद॥
इंद्रिये द्वारे मन धावे सैरे । नांगवे करिता चिंता काही । हात पाय कान मुख लिंगस्थान ।
नेत्रद्वारे घ्राण पाही । जया जैसी सोय तया तैसे होय । क्षण एक स्थिर नाही ।
करिती तडातोडी ऐसी यांची खोडी । न चले माझे यास काही ॥२॥
शरीरसंबंधु पुत्र पत्नी बंधु । धन लोभ मायावंते । जन लोकपाळ मैत्र हे सकळ ।
सोइरी सज्जने बहुते । नाना कर्म डाय करिती उपाय । बुडावया घातपाते ।
तुका म्हणे हरी राखे भलत्या परी । आम्ही तुझी शरणागते ॥३॥
अर्थ
हे ऋषीकेशा या संसारापासून माझी सुटका केव्हा होईल ते मला काही कळत नाही. देवा या भवसागरात मी सुटका होण्यासाठी जो जो प्रयत्न करतोय तो तो मी अधिकच त्यात गुंतत चाललो आहे आणि विषय भोगाच्या आशेने मला देशोधडीला लावले आहे. देवा तुझ्याविषयी भक्तीभाव तुझे भजन हे तर माझ्या ठिकाणी नाहीये त्यामुळे मी तुझ्या चरणाला अंतरलो आहे. या भवसागरात मला अनेक उपाधींनी पूर्णपणे वेढले आहे मला पुढे मागे होण्यासाठी थोडीशीही जागा शिल्लक राहिली नाहीये. हे नारायणा आता तूच माझी लाज राख मी तर सर्व गोष्टींनी हीन आहे दीन आहे म्हणूनच मी तुझ्या ठिकाणी लीन झालो आहे. त्यामुळे देवा माझ्यासारख्या याचकाला आता काय करावे ते कळत नाही माझे काही गुण दोष असतील आणि संचित कर्मे असतील तर ते सर्व तू जाळून टाक. देवा माझे मन इंद्रियाच्या व्दारा सैरावैरा धावत आहे ते काही केल्या ऐकत नाही. देवा माझे हात पाय कान मुख लिंगस्थान नेत्र घ्राण म्हणजे नाक जिकडे वाटेल तिकडे धाव घेत आहेत. एक क्षणभर देखील ते स्थिर राहात नाहीत अशा प्रकारे या इंद्रियांनी माझी ओढ ताण केली आहे व हे असे खोडी करतच राहातात आणि यांच्या पुढे तर माझे काही चालत नाही. माझ्या शरीराशी संबंधीत असलेले पुत्र पत्नी बंधू हे धनलोभी मायावंत लोक, व हे जनलोक मित्र सोयरे सज्जन हे सगळेच असे विविध प्रकारचे घाव डावांचे उपाय करतात प्रसंगी घातपात करण्यासही पुढे मागे पाहात नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात हे हरी तू आमचे कोणत्याही प्रकारे रक्षण कर आम्ही तुला शरण आलेलो आहोत.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA