नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.१४९६
लचाळाच्या कामा नाहीं ताळावाळा । न कळे ओंगळा उपदेश ॥१॥
वचनचर्येची न कळे चांचणी । ऐसी संघष्टनी अमंगळ ॥ध्रु.॥
समय न कळे वेडगळ बुद्धि । विजाती ते शुद्धि चांच चाट ॥२॥
तुका म्हणे याचा धिक्कारचि बरा । बहुमति खराहूनि हीन ॥३॥
अर्थ
मूर्ख मनुष्याला कितीही उपदेश केला तरी त्याला समजत नसतो आणि त्याच्या कोणत्याही कामात ताळमेळ नसतो. त्याला चांगले बोललेले व चांगले माणसे समजत नाही. अशांची संगती मंगळ असते वेडगळ माणसांना वेळ आणि काळ कळत नाही व अशा प्रकारच्या माणसांना आपण कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी ते बदलत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात असे अनेक लोक आहेत की ज्यांची बुद्धी गाढवा होऊनही खालची पातळीची आहे आणि अशांचा धिक्कार करणे हेच योग्य आहे
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA