नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. 347
काय दरा करील वन । समाधान नाही जव ॥१॥
तरी काय तेथे असती थोडी । काय जोडी तयांसी ॥धृपद॥
रिगता धावा पेवामध्ये । जोडे सिद्धी ते ठायी ॥२॥
काय भस्म करील राख । अंतर पाख नाही तो ॥३॥
वर्णआश्रमाचे धर्म । जाती श्रम जालिया ॥४॥
तुका म्हणे सोंग पाश । निरसे आस ते हित ॥५॥
अर्थ
जोपर्यंत मनामध्ये पूर्णपणे समाधान पूर्वक अंतकरण तयार होत नाही तोपर्यंत मग तो मनुष्य कितीही वनांमध्ये दऱ्याखोऱ्यांमध्ये जाऊन राहिला तरी काय उपयोग आहे काय? जर तसे काही असते तर जंगलामध्ये राहणारे पशु पक्षी आहेत त्यांना त्याचा लाभ झाला नसता? जर धान्याचे कोठार म्हणजे पेवे मध्येशिरले तर लगेच अन्न खाता येईल काय? अंतःकरण जर शुद्ध नसेल तर कितीही यज्ञकुंडातील राख अंगाला लावली असली तरी काही उपयोग आहे काय? वर्णाश्रम धर्माचा मनुष्याला कंटाळा आला तर तो त्याचा त्याग करतो. तुकाराम महाराज म्हणतात साधकावस्थेमध्ये असताना आशेचा पूर्णं निरास होणे महत्त्वाचे असते बाकी सर्व प्रयत्न म्हणजे एक प्रकारचे सोंग होय.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
