नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. 551
ध्याई अंतरिच्या सुखे । काय बडबड वाचा मुखे ॥१॥
विधिनिषेध उर फोडी । जव नाही अनुभवगोडी ॥धृपद॥
वाढे तळमळ उभयता । नाही देखिले अनुभविता ॥२॥
अपुलाल्या मते पिसे । परि ते आहे जैसेतैसे ॥३॥
साधनाची सिद्धी । मौन करा स्थिर बुद्धी ॥४॥
तुका म्हणे वादे । वाया गेली ब्रम्हवृंदे ॥५॥
अर्थ
हृदयातील(अंतरातील)हरीचे ध्यान करा. मुखाने व्यर्थ बडबड करण्यात काय अर्थ आहे. हरीचे सतचिदआनंदाची जो पर्यंत अनुभूती येत नाही, तो पर्यंत विधिनिषेधांच्या चक्रात फिरून डोक्याला फार त्रास होत असतो. अंतरंगात हरी प्रेमाची बासरी वाजवीत आहे ती जो पर्यंत ऐकू येत नाहि, तो पर्यंत हृदयाची तळमळ वाढत असते. मनुष्य आपल्याचं विचाराने भारलेला असतो, त्याच प्रमाणे वागतो. त्यामुळे त्याची प्रगती होत नाही. तो आहे त्या स्थितीत राहतो. तुम्ही मौन धारणा करा हरीचे चिंतन करा. बुद्धी स्थिर करा. यातच सर्व साधनाची सिद्धी आहे. तुकाराम महाराज म्हणतात विविध तऱ्हेचे व्यर्थ वाद करून काही ब्रम्हवृंद वाया गेले आहेत.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
