८२२, अभंग :- न मनावे तैसे गुरूचे वचन । जेणे नारायण अंतरे ते:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. ८२२
न मनावे तैसे गुरूचे वचन । जेणे नारायण अंतरे ते ।
आड आला म्हणूनि फोडियेला डोळा । बळिने आंधळा शुक्र केला ॥१॥
करी देव तरी काय नव्हे एक । का तुम्ही पृथक सिणा वाया ॥धृपद॥
उलंघुनि भ्रताराची आज्ञा । अन्न ॠषिपत्न्या घेउनि गेल्या ।
अवघेचि त्यांचे देवे केले काज । धर्म आणि लाज राखियेली ॥२॥
पितयासी पुत्रे केला वैराकार । प्रल्हादे असुर मारविला ।
बहुत विघ्ने केली तया आड । परि नाही कैवाड सांडियेला ॥३॥
गौळणी करिती देवाशी व्यभिचार । सांडुनी आचार भ्रष्ट होती ।
तया दिले ते कवणासी नाही । अवघा अंतर्बाही तोचि जाला ॥४॥
देव जोडे ते करावे अधर्म । अंतरे ते कर्म नाचरावे ।
तुका म्हणे हा जाणतो कळवळा । म्हणोनि अजामेळा उद्धरिले ॥५॥

अर्थ
ज्या वचना मुळे नारायण आपल्यापासून अंतरेल ते वाचन गुरुचे जरी असेल तरी ते वचन ऐकू नये. चांगले कर्म कारायला जाणार तर वामनाच्या हातातील झारीने दानाचे बळी राजा पाणी सोडणार तेवढ्यात शुक्राचार्य झारीच्या तोटीत सूक्ष्म रूपाने जावून बसले. तर बळीराज्याने तोटीत काही गुतले आहे हे समजून तोटीत काडी घातली व आपले गुरु शुक्राचार्य यांचा एक डोळा फुटला. देवाला अशक्य असे काहीच नाही मग तुम्ही भगवंताला सोडून इतर साधनांच्या मागे का फिरता? आपल्या भ्राताराची(पतीची)आज्ञा उल्लंघून ऋषींच्या पत्नी कृष्णाकडे अन्न घेवून गेल्या देवाने हि त्यांचे धर्म आणि लाज यांचे रक्षण केले. पिता आणि पुत्र यांच्यात वैर(प्रल्हाद आणि हिरण्यकश्यप)तेव्हा त्याला भगवंताकडून मारविले, कारण त्या पित्याने हरीकार्‍यात अनेक विघ्न्य आणली पण प्रल्हादाने आपला निर्धार सोडला नाही गवळणीने कृष्णाशी व्याभिचार केला. स्वतःचा आचार धर्म सोडला व त्या देवाशी एकरूप झाल्या त्यांना जे भागवंताने देलेते कोणालाही दिले नाही तो त्यांच्याशी अंतबाह्य एक झाला. देवाच्या प्राप्तीसाठी अधर्म करावा लागला तरी करावा हरीचे व आपले अंतर पडेल असे कर्म करू नये. तुकाराम महाराज म्हणतात हाच भगवंताविषयी असलेलेला कळवळा तो हरी जाणतो म्हणूनच तर पापी अजामेळ त्याने त्याचा उद्धार केला.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading