नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. ६८५
संतांचे सुख झाले या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥१॥
तेथे माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥धृपद॥
निर्गुण आकार जाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनिया ॥२॥
तीर्थे त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणासी ॥३॥
अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड । वागो नेदी आड कोणी तया ॥४॥
तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी । राहिले चरणी निकटवासे ॥५॥
अर्थ
संतांच्या संगतीने देवाला सुख झाले म्हणून देव त्यांची सेवा करतात. ज्या संतांची सेवा देवाला करायला आवडते त्या संतांचे वर्णन करण्या इतका माझा अधिकार काय? जो निर्गुण असा परमात्मा सगुण साकार होऊन संतांची सेवा करतो पूजा करतो आणि त्यांना दंडवत घालतो, तीर्थे स्वत स्वच्छ होण्यासाठी संतांच्या पदस्पर्शाचि इच्छा करतात, पापी लोकांच्या पापाचे हरण करून ते मलीन झालेले असतात व ते निर्मळ होण्यासाठी संतांच्या पदस्पर्शाचि इच्छा करतात. म्हणून तेथे अस्ष्टमहासिद्धीना कोणी विचारत नाही. त्यांना कोणी जवळ फिरकू देत नाही. त्यांचा अडथळा कोणी जुमानत नाही. तुकाराम महाराज म्हणतात संत हे बलवंत शोरोमणी आहेत. तरीही विठ्ठलाच्या चरणी त्यांनी निकट वास्तव्य केले आहे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
