११०४, अभंग :- तुज न भे भी कळीकाळा । मज नामाचा जिव्हाळा :- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. ११०४
तुज न भे भी कळीकाळा । मज नामाचा जिव्हाळा॥१॥
माझा बळीया नेणसी कोण । संता साहे नारायण ॥धृपद॥
शंख वधिला सागरी । वेद घेउनि आला चारी ॥२॥
कूर्मे दैत्य वधिला जेठी । हात पाय लपवी पोटी ॥३॥
वाराहरूप धरिले गाढे । धरा प्रतापे धरिली दाढे ॥४॥
हिरण्यकश्यप विदारिला । भक्त प्रल्हाद रक्षिला ॥५॥
वामन जाला दिनानाथ । बळी पाताळी घातला दैत्य॥६॥
छेदुनिया सहस्र भुजा । कामधेनु आणिली वोजा ॥७॥
शिळा प्रतापे सागरी तारी । स्थापी बिभीषण रावण मारी ॥८॥
मारोनिया कंसराव । पिता सोडविला वसुदेव ॥९॥
पांचाळीसी गांजिता वरी । वस्त्रे आपण जाला हरी ॥१०॥
गजेंद्र स्मरे राम राम । त्यासी पाववी वैकुंठधाम ॥११॥
तुका म्हणे हरीरूप जाले । पुन्हा नाही जन्मा आले ॥१२॥

अर्थ
हे कळिकाळा मी तुला केव्हाच भिणार नाही कारण माझ्या चित्तामध्ये नामा विषयी विशेष जिव्हाळा आहे. अरे माझा पाठीराखा कोण आहे ते तुला माहीत आहे काय , अतिशय बलाढ्य असा संतांना सतत सहाय्य करणारा नारायणच माझा पाठीराखा आहे. मी तुला त्याच्या काही कथा सांगतो ते ऐक. ज्यावेळी शंखासुराने चारही वेद चोरुन सागरात नेले त्यावेळी या नारायणाने त्याचा वध करून चार वेद परत आणले. कुर्म अवतारात या हरि ने आपले हात-पाय लपून मंदार पर्वत आपल्या पाठीवर घेतला आणि देवांची मदत केली आणि चोरून अमृत पिणाऱ्या राहू दैत्याचा याने शिरच्छेद केला. वराह अवतारामध्ये याने हिरण्याक्षाचा वध करून पाताळात नेलेल्या पृथ्वीला आपल्या दाढेवर धरून वर काढले. पुढे त्याने हिरण्यकश्यपूचे पोट फाडून आपल्या भक्ताचे म्हणजे प्रल्हादाचे रक्षण केले. त्यानंतर त्याने वामनाचे र�

अर्थ नाही टाका तपासा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading