१०४९, अभंग :- पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ :- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग – १०४९
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥१॥
तयाच्या चिंतने तरतील दोषी । जळतील रासी पातकाच्या ॥धृपद॥
देव इच्छी रज चरणींची माती । धावत चालती मागे मागे ॥२॥
काय त्या उरले वेगळे आणीक । वैकुंठनायक जया कंठी ॥३॥
तुका म्हणे देवभक्तंचा संगम । तेथे ओघ नाम त्रिवेणीचा ॥४॥

अर्थ
जो सर्वकाळ अच्युता चे नाम आपल्या वाणीने घेतो त्याचा देह पवित्र आहे आणि वाणी पुण्यवंत आहे. आणि त्याचे सतत नाम घेणाऱ्या वैष्णवांचे स्मरण जरी केले तरी कितीही दोष असले तरी त्यांचा नाश होतो. आणि तो मनुष्य हा भवसमुद्र तरुन जातो व त्याच्या सर्व पापाच्या राशी जळून जातात. देव सुद्धा त्या पवित्र वैष्णवांच्या पायाची रज म्हणजे माती आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न करतो व त्याच्या मागे मागे सारखा फिरत असतो. त्या वैष्णवांच्या कंठामध्ये सदासर्वकाळ वैकुंठ नायकाचे नाम आहे व मग वैष्णवांच्या मध्ये आणि देवा मध्ये कोणता फरक उरला आहे. तुकाराम महाराज म्हणतात गंगा आणि यमुना यांचा संगम झाला की तेथे सरस्वती गुप्त रूपाने असते तसेच देव आणि भक्त यांचा संगम झाला की तेथे नामरूपी त्रिवेणी संगम आपोआप तयार होतो.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading