नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. 243
पढियते आम्ही तुजपाशी मागावे । जीवीचे सांगावे हितगुज ॥१॥
पाळसील लळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे जननिये ॥धृपद॥
जीव भाव तुझ्या ठेवियेला पायी । तूचि सर्वा ठायी एक आम्हा ॥२॥
दुजियाचा संग लागो नेदी वारा । नाही जात घरा आणिकाच्या ॥३॥
सर्वसत्ता एकी आहे तुजपाशी । ठावे आहे देसी मागेन ते ॥४॥
म्हणउनि पुढे मांडियेली आळी । थिंकोनिया चोळी डोळे तुका ॥५॥
अर्थ
हे पांडुरंग आम्हाला जे आवडते ते आम्ही तुझ्या पाशी मागू व आमचे जीवाचे जे हित गुज आहे ते आम्ही तुला सांगू. हे विठ्ठला तू आमचा सांभाळ आवडीने लाडाने व वात्सल्य भावनेने करशील. हे दिन वत्सला विठ्ठला तू या जगाची कृपाळू जननी आहेस. आम्ही आमचा जीव भाव सर्व तुझ्या पायी ठेवला आहे सर्व ठिकाणी तूच आम्हला तारणारा आहे. आम्हांला दुसर्याच्या संगतीचा वाराही लागू देऊ नकोस आणि मी अणिकाच्या घरी सुद्धा जाता नाही. अरे पांडुरंगा मी जे काही मागेन ते तू मला नक्की देणार कारण सर्व सत्ता तुझ्या पाशी आहे हे मला माहित आहे. तुकाराम महाराज म्हणतात आणि म्हणूनच तर देवा मी तुझ्या पुढे आळी(हट्ट)मांडला आहे आणि डोळे चोळीत तुझ्या पुढे रडत आहे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
