१३०, अभंग :- ब्रम्हनिष्ठ काडी ।जरी जीवानावे मोडी :- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.130

ब्रम्हनिष्ठ काडी ।
जरी जीवानावे मोडी ॥१॥
तया घडली गुरुहत्या ।
गेला उपदेश तो मिथ्या ॥धृपद॥
सांगितले कानी ।
रूप आपुले वाखाणी ॥२॥
भूताच्या मत्सरे ।
ब्रम्हज्ञान नेले चोरे ॥३॥
शिकल्या सांगे गोष्टी ।
भेद क्रोध वाहे पोटी ॥४॥
निंदास्तुति स्तवनी ।
तुका म्हणे वेची वाणी ॥५॥

अर्थ

स्वताला जो ब्रम्‍हनिष्ठ म्हणवून घेतो त्याने प्राणिमात्रांच्या नावे हिरव्या गवताची काडी जरी मोडली तरी त्याला गुरु हत्येचे पातक लागते .गुरुने केलेला उपदेश खोटा ठरतो .गुरुने त्याच्या कानात ज्या ब्रम्‍हज्ञानाचा उपदेश केलेला असतो, त्या ब्रम्‍हरूपाची तो लोकांजवळ वाच्यता करतो .स्वतःला ब्रम्‍हज्ञानी महानवुन घेतो आणि भुत मात्रांचा द्वेष करतो.अश्या माणसांचे ब्रम्‍हज्ञान चोर पळवून नेतात .शिकलेल्या गोष्टी तो लोकांना सांगतो, पण भेदामुळे, क्रोध त्याच्या मनात वाहत असतो .तुकाराम महाराज म्हणतात, त्याची वाणी नेहमी लोकनिंदा, स्तुति-स्तवने यातच आपला वेळ व शक्ती तो खर्च करतो .

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ गाथा संपूर्ण अभंग सूची

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading