१०८, अभंग :- हरी तू निष्ठुर निर्गुण। नाही माया बहु कठिण।:- संत तुकाराम सार्थ गाथा
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.108
हरी तू निष्ठुर निर्गुण ।
नाही माया बहु कठिण ।
नव्हे ते करिसी आन ।
कवणे नाही केले ते ॥१॥
घेऊनि हरीश्चंद्राचे वैभव ।
राज्य घोडे भाग्य सर्व ।
पुत्र पत्नी जीव ।
डोंबाघरी वोपविली ॥धृपद॥
नळा दमयंतीचा वियोग ।
विघडिला त्यांचा संग ।
ऐसे जाणे जग ।
पुराणे ही बोलती ॥२॥
राजा शिबी चक्रवर्ती ।
कृपाळु दया भूती ।
तुळविले अंती ।
तुळे मास तयाचे ॥३॥
कर्ण भिडता समरंगणी ।
बाणी व्यापियेला रणी ।
मागसी पाडोनी ।
तेथे दात तयाचे ॥४॥
बळी सर्वस्वे उदार ।
जेणे उभारिला कर ।
करूनि काहार ।
तो पाताळी घातला ॥५॥
श्रियाळाच्या घरी ।
धरणे मांडिले मुरारी ।
मारविले करी ।
त्याचे बाळ त्याहाती ॥६॥
तुज भावे जे भजती ।
त्यांच्या संसारा हे गति ।
ठाव नाही रे पुढती ।
तुका म्हणे करिसी ते ॥७॥
अर्थ
हे हरी, तू फार कठोर आहेस तू निर्गुण, निराकार असल्यामुळे निष्ठुर आहेस, कोणी केली नसतील इतकी निष्ठुर कामे तू केली आहेस .सत्यवचनि राजा हरीश्चंद्राला त्याच्या पत्नी व् पुत्रा पासून दूर केलेस, त्याचे राज्य वैभव हिरावुन घेतलेस, त्याला डोंबाघरी पाठविलेस .पुराणात संगीतल्या प्रमाणे नल-दमयंतीच्या प्रेमसंमंधात विघ्न आणून नल-दमयंतीचा वियोग घडून आणलास .कृपाळू, दयाळु शिबिराजाला स्वतःच्या मंडीचे मास कापायला लाउन त्याची परीक्षा घेतलीस .दानशुर कर्ण समरांगणात बाण लागून पडला असता त्याचे सोन्याचे दात मागितलेस .ज्या बलिराज्याने तुला पृथ्वीचे, आकाशाचे व स्वर्गाचे राज्य दिल , त्याला कपटिने पाताळात गाडलेस .श्रीयाळाच्या घरी त्याच्या पुत्राचे मांस मागीतलेस .तुकाराम महाराज म्हणतात, तुझी भक्ती करणाऱ्या भक्ताची तू कठोर परीक्षा घेऊन त्यांच्या संसाराची वाताहत करतोस .
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA