ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 140

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १४०

जिव्हेच्या निडळी । नामाक्षराची वोळी । कान्हो वनमाळी । या वोजा ॥ लिहोन घाली पान-पुसती जैसी । भलतिये रसीं बुडी दे कां ॥ माझे डोळसमजी । सुनिळ सहजी । होय तुं बिजीं । बाहुलिये ॥ ऐसि वाचा दृष्टी नामरुपे आथिली । वासनेवरी वहिली उठो दे कां ॥ तुझे उठिलेंपण आम्हां होवावें निकें । तरी गोसावी पाइकेंसी यावें किजी ॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलु आंतु बाहेरी सुखें । तरी तुजसी म्यां एके नांदावे किजी ॥

अर्थ:-

जिभेच्या टोकावर कान्हो वनमाळी ह्या नामअक्षरांची आशी ओळ लिहावी की ती कधी पुसली जाऊ नये. अशी लिहा की ती दुसऱ्या कोणत्याही रसामध्ये मिटली जाणार नाही. माझ्या डोळ्यामध्ये हे सुनिळा तु डोळ्यातील गोल असणारी बाहुली बनुन रहा म्हणजे तुच मला दिसशील. असे वाचेत नाम व डोळ्यात तुझे रुप असेल तर मनातील वासने पेक्षा वेगळे उठुन निघता येईल. असे तुझे ध्यान मला लागु दे म्हणजे तुझा गोसावी होऊन मला सेवक होवुन सेवा करता येईल. माझे पिता व रखुमाईचे पती तुम्ही माझ्यात अंतरबाह्य भरुन राहिला तर मला ऐक्यत्वाने तुमच्या सोबत नांदता येईल.

Leave a Reply