ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.738

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७३८

श्रीगुरूसारिखा असतां पाठिराखा । इतरांचा लेखा कोण करी ॥१॥ राजयाची कांता काय भीक मागे । मनाचिये जोगें सिद्ध पावे ॥२॥ कल्पतरू तळवटीजो कोणी बैसला । काय वाणू त्याला सांगिजो जी ॥३॥ ज्ञानदेव म्हणे तरलों तरलों । आतां उद्धरलों गुरूकृपें ॥४॥

अर्थ:-

जीवब्रह्मैक्य ज्ञानदान करण्यामध्ये ईश्वरापेक्षा अत्यंत श्रेष्ठ अशा श्रीगुरूचा पाठिंबा असेल तर इतर ज्या रिद्धिसिद्धी किंवा संसारिक सुखे यांची पर्वा कोण करील. मनाप्रमाणे सर्व ऐश्वर्य भोगण्यास मिळणाऱ्या राजाच्या बायकोला भीक मागावयाला जाण्याची पाळी येईल काय? किंवा कल्पतरूखाली बसलेल्या पुरूषास काय कमी आहे. श्रीगुरू निवृत्तिरायांच्या कृपेने माझा उद्धार झाला म्हणून मी संसार समुद्रांतून पार पडलो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात

Leave a Reply