ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.454

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-१३ वे, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४५४.

आनु नेणें कांही । विठ्ठलु स्मरे देहभावीं ॥१॥ पुंडलिका हे चिंतन । म्हणोनी विटेवरी हे ब्रह्म ॥२॥ रखुमादेविवरू शहाणे । विठ्ठलु पाहुणे पुंडलिक ॥३॥

अर्थ:-

माझा देहभाव जाण्याकरिता मी त्या विठोबारायाच्या स्मरणाशिवाय दुसरे काहीच करीत नाही. पुंडलिकरायांला या श्रीविठ्ठलाचा सतत ध्यास लागल्यामुळे वेदशास्त्राची खूण जे ब्रह्मस्वरूप तेच श्रीविठ्ठलाच्या रूपाने येऊन उभे राहिले म्हणून शहाण्या पुरूषाने इतर कांही एक न चिंतन करता एका श्रीविठ्ठलाचे चिंतन करावे त्यामुळे पुंडलिकरायाप्रमाणे त्यालाही माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठलांची प्राप्ती होईल असे माऊली म्हणतात.

Leave a Reply