ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.279
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २७९
अहंते न पाहे नाही तेंची पाहे । भुलिसवें जाय काय करू ॥ सोंहभावे सोकरी कोहंभावे हो करी । पाहे दुरीच्या दुरी एकतत्वीं ॥ आदि हे माजिठें रूपी रूप पैठे । असोनिया द्रष्टे न पाहे भुली ॥ बापरखुमादेविवर भुलिभूल रे हरि । माजिठा श्रीहरि आपरूपे ॥
अर्थ:-
अहंकाराने आत्मत्वाने परमात्म्याला पाहू नकोस मायेच्या भुलीने जीव उगीच वाहात जातो. देहादिक मीच आहे. असे समजता याला काय करावे.कोहंभावे’ म्हणजे मी कोणआहे. अशी चिंता करतोस. त्यापेक्षा मी परमात्माच आहे. अशा सोहंभावाने आत्मस्वरूपात संग्रह कर. तो आत्मा देहादिक अनात्म पदार्थाहून फार दुर आहे. म्हणुन त्या एकतत्त्वरूप आत्म्याला पाहा. अगोदर रूपवान माया हे एक सुंदर वस्त्र आहे. त्या वस्त्राला न भुलता आपण हरिरूपच आहो असा निश्चय कर असे माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल ह्यांना विसरु नकोस असे माऊली सांगतात.
