ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.309
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३०९
पाहणे पाहाते सांडुनि निरुतें । पाहिलिया त्यातें तूंचि होसी ॥१॥ तोचि तूं आपण तत्त्व तें तूं जाण । नलगे साधन आन कांहीं ॥२॥ भानुबिंबेवीण भासले तम । ज्ञानदेव वर्म अनुवादला ॥३॥
अर्थ:-
पाहणे म्हणजे ज्ञान, पाहाते म्हणजे ज्ञाता. दृश्य द्रष्टादि भाव एका बाजुला सारुन परमात्म्याला पाहू गेलास तर तो परमात्मा तूच होशील. परमात्मा आपल्या स्वरुपांच्या ठिकाणी आहे असे जाण त्याच्या शिवाय साधन नाही. सूर्यप्रकाश अंधाराच्या विरोधी आहे पण आत्मप्रकाश मात्र सूर्याचे व अंधाराचे तम’ म्हणजे अज्ञान प्रकाशीत करतो. ह्या आत्मज्ञानाच्या वर्माचा श्रीगुरु कृपेने मी अनुवाद केला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
