ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 74

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ७४

हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥ तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदे ॥२॥ मातृपितृभ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर हो‌ऊनि ठेले ॥३॥ ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिले माझ्या हातीं ॥४॥

अर्थ:-

 जर सतत हरिनाम मुखाने घेतले तर त्याचे शरिर गाईप्रमाणे पवित्र होते. ज्याने असे हरिनाम घेतले तो कल्पांता पर्यंत वैकुठात वास करतो. येवढेच नाही तर त्याने घेतलेल्या नामामुळे त्याचे माता पिता भाऊबंध त्याच्यासकट चतुर्भुज विष्णुरुपाला प्राप्त होतात. निवृतिनाथांच्या असिम कृपेने हे गुढगम्य ज्ञान मला प्राप्त झाले असे माऊली सांगतात.

Leave a Reply