नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग – १०९७
न कळे ते कळो येईल उगले । नामे या विठ्ठले एकाचिया ॥१॥
न दिसे ते दिसो येईल उगले । नामे या विठ्ठले एकाचिया ॥धृपद॥
न बोलो ते बोलो येईल उगले । नामे या विठ्ठले एकाचिया ॥२॥
न भेटे ते भेटो येईल आपण । करिता चिंतन विठोबाचे ॥३॥
अलभ्य तो लाभ होईल अपार । नाम निरंतर म्हणता वाचे ॥४॥
तुका म्हणे जीव आसक्त सर्वभावे । तरतील नावे विठोबाच्या ॥५॥
अर्थ
श्रद्धेने विठोबाचे नाम घेतले की न कळणाऱ्या गोष्टीही आपोआप कळतात. जे काही अदृष्य स्वरूपात आहे तेही दिसू लागते केवळ विठोबाचे नाम स्मरण केले तर. जे बोलण्यासाठी अवघड आहे ते वेदार्थही आपण सहज बोलू शकतो केवळ विठ्ठलाचे नामस्मरण मनापासून करण्याची आवश्यकता आहे. ज्याची भेट ही अशक्य आहे त्यांची भेट ही आपोआप होईल ते केवळ विठ्ठलाच्या नामस्मरणाने. अलभ्याचाही लाभ पुष्कळ होईल ते केवळ विठोबाचे नामस्मरण निरंतर आपल्या वाचेने केल्यानेच. तुकाराम महाराज म्हणतात जे लोक या भवसागरात आसक्त झालेले आहेत ते मनोभावे विठोबाचे नामस्मरण करतील तर ते देखील तरुण जातील.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
