170, अभंग :- एकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजन :- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. 170
एकादशीस अन्न पान ।
जे नर करिती भोजन ।
श्वानविष्ठे समान ।
अधम जन तो एक ॥१॥
ऐका व्रताचे महिमान ।
नेमे आचरती जन ।
गाती ऐकती हरीकीर्तन ।
ते समान विष्णूशी ॥धृपद॥
अशुद्ध विटाळसीचे खळ ।
विडा भिक्षता तांबूल ।
सापडे सबळ ।
काळाहाती न सुटे ॥२॥
सेज बाज विलास भोग ।
करी कामिनीचा संग ।
तया जोडे क्षयरोग ।
जन्मव्याधी बळिवंत ॥३॥
आपण न वजे हरीकीर्तना ।
अणिका वारी जाता कोणा ।
त्याच्या पापे जाणा ।
ठेंगणा तो महामेरु ॥४॥
तया दंडी यमदूत ।
झाले तयाचे अंकित ।
तुका म्हणे व्रत ।
एकादशी चुकलीया ॥५॥

अर्थ :-
एकादशीला भोजन करणारे अधम आहेत; ते खात असलेले अन्न कुत्र्याच्या विष्टे प्रमाणे आहे. एकादशी व्रताचे महत्त्व असे आहे की जे कोणी हे व्रत करतील, हरिकीर्तन करतील ते विष्णुसमान आहेत. एकादशीला जो पाणाचा विडा खाईल त्याने विटाळशीचा स्त्राव खाल्ल्याप्रमाणे होईल. त्याला काळ खाऊन टाकिल. या व्रताच्या दिवशी जो पत्नीशी व अन्य स्त्रीशी संग करेल, विविध प्रकारचे भोग घेईल, त्याला क्षय-महारोगासारख्या व्याधी जडतील. या दिवशी जो हरिकीर्तन करत नाही व इतरांनाही करू देत नाही तो पर्वता एवढ्या पापाचा धनी होतो, त्याच्या पापापुढे मेरु पर्वतही लहान वाटतो. तुकाराम महाराज म्हणतात, जे लोक एकादशी व्रत करत नाही ते शिक्षेस पात्र आहेत व त्यांना यमदूत शिक्षा देतो.

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ गाथा संपूर्ण अभंग सूची

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *