अशौच* रोदन (रडणे) केल्यास अशौच

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

अशौच* रोदन केल्यास अशौच

ब्राह्मणादिकांनी आपल्या सवर्णातील मृताविषयी अस्थिसंचयनापूर्वी रोदन केल्यास स्नान. त्यानंतर रोदन केल्यास आचमन करावे. इतरांच्या विषयी अस्थिसंचयनापूर्वी रोदन करणार्‍या ब्राह्मणास त्रिरात्र, अस्थिसंचयनानंतर १ रात्र अशौच. इतरांविषयी अस्थिसंचयनापूर्वी त्याच्या घरी राहणे इत्यादि संबंध असता १ रात्र. त्यानंतर स्नान करावे. सपिंडांनी अनुगमन व रोदन केल्यास दोष नाही. या अशौचातही कर्मलोप नाही. येथे सर्वत्र ज्यास जितका अशौचकाल सांगितला तितका पाळल्यावर स्नानानेच तो शुद्ध होतो. स्नान केल्यावाचून तितका काल मात्र घालविल्याने शुद्धि होत नाही. अंत्यकर्म करणाराने अस्थिसंचयनापूर्वी स्त्रीसंग केल्यास चांद्रायण व अस्थिसंचयनानंतर तीन प्राजापत्ये प्रायश्चित्त करावे. अन्यमृताशौचीयांनी अस्थिसंचयनापूर्वी स्त्रीसंग केल्यास त्रिरात्र उपोषण करावे. अस्थिसंचयनानंतर १ रात्र उपोषण करावे.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading