ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.404
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४०४
प्रणवाची शक्ति शिव प्रणवची । क्षर अक्षर सांची प्रणव तें ॥१ त्रिकुट श्रीहाट गोल्हाट ब्रह्मरंध्र । प्रणव निरंतर ऐक्य झाला ॥२॥ ज्ञानदेव आपण प्रणव झाला आधीं । ध्याता ब्रह्मपदीं प्रणवची ॥३॥
अर्थ:-
प्रणव ओंकार आहे व ओंकार ब्रह्माचे प्रतीक आहे म्हणून प्रणव ब्रह्मच आहे. सर्व चराचर सृष्टि प्रणवस्वरुप आहे. एकदा का प्रणव ब्रह्मरुप आहे असे मानले की शंकर, पार्वती या देवता सर्व स्थीर चल पदार्थ, त्रिकुट, गोल्हाट, ब्रह्मरंधकार महायोगस्थाने ही सर्व प्रणवरुपच आहेत. यावरुन त्या ब्रह्माचे ध्यान करणारा मी ही ब्रह्मरुपच झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.