
“जयदेव जयदेव जय जय शिवराया ! या या अनन्य शरणा आर्या ताराया”. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित 100% शुद्ध संपूर्ण आरती पहा ऐका लिहा, मराठ्यांचे विरवैभव छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सर्व काही एकाच वेबसाईटवर चरित्र ,गड वा किल्ले, कादंबरी, आरती, पोवाडे, महत्वाची माहिती. 96-कुळी-मराठा https://96kulimaratha.com/ हि-वेबसाईट-पहा
The glory of Marathas Everything about Chhatrapati Shivaji Maharaj in one website Biography, Forts, Novels, Aarti, Powade, Important information. 96-Kuli-Maratha https://96kulimaratha.com/ see-this-website
आरती ३ :- जयदेव जयदेव जय जय शिवराया !
या या अनन्य शरणा आर्या ताराया
प्रौढ प्रताप पुरंदर…..क्षत्रियकुलावतंस……….
सीवासनाधिश्वर…… राजा धीराज…..
श्री श्री श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय
जयदेव जयदेव जय जय शिवराया !
या या अनन्य शरणा आर्या ताराया !!धृ!!
आर्यांच्या देशावरी म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो शिव भूपाला
सद् गदिता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदुनि तव हृदय न कां गेला?…..॥१॥
श्री जगदंबाजी स्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?…….॥२॥
त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
भगवन् भगवतगीता सार्थ कराया या……….॥३॥
ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला
देशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला
देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला
बोला तत् श्रीमत् शिव नृप की जय बोला……….॥४॥


