नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. २३८१
तुज करिता होय ऐसे काही नाही । डोंगराची राई रंक राणा ॥१॥
अशुभाचे शुभ करिता तुज काही । अवघड नाही पांडुरंगा ॥धृपद॥
सोळा सहस्त्र नारी ब्रम्हचारी कैसा । निराहारी दुर्वासा नवल नव्हे ॥२॥
पंचभ्रतार द्रौपदी सती । करिता पितृशांती पुण्य धर्मा ॥३॥
दशरथा पातके ब्रम्हहत्ये ऐसी । नवल त्याचे कुशी जन्म तुझा ॥४॥
मुनेश्वरा नाही दोष अनुमात्र । भांडविता सुत्र वध होती ॥५॥
तुका म्हणे माझे दोष ते कायी । सरता तुझा पायी जालो देवा ॥६॥
अर्थ
देवा तु मनात आणले तर काय करू शकत नाहीस डोंगराचे मोहरी आणि रंकाचा राजा तु करू शकतोस. हे पांडुरंगा अशुभाचे शुभ करणे हे तुझ्यासाठी काही अवघड नाही. देवा तुला सोळा सहस्त्र बायका असूनही तु ब्रम्हचारी कसा आणि दुर्वास ऋषींनी साठ खंड्या अन्न खाऊन देखील ते नीराहारी कसे हे आश्चर्य नाही काय? देवा पाच पतींचा भोग घेऊन देखील द्रोपदी सती म्हणजे पतीव्रता कशी आणि भीष्माचार्य सारख्या पित्रांचा वध करूनही धर्मराजाला पुण्य कसे प्राप्त झाले? देवा दशरथ राजाने ब्रम्हहत्या केली व पातकांची राशी ठरला तरीदेखील तु त्याच्या कुशीत जन्म घेतलास हे नवल नाही काय? नारद मुनींनी अनेक ठिकाणी चहाडी लावून भांडणे लावून दिली व त्या भांडणांमध्ये अनेक लोकांचे वध देखील झाले आहेत परंतु त्यांना अनुमात्र सुद्धा दोष लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा मग यांच्या सर्वांच्या दोषा पुढे माझे दोष ते किती आहेत आता मी तुझ्या पायाशी सरता झालो आहे व निष्पाप होऊन तुझ्याच ठिकाणी राहिलो आहे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
