नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. ८४७
न लगे मायेसी बाळे निरवावे । आपुल्या स्वभावे ओढे त्यासी ॥१॥
मज का लागला करणे विचार । ज्याचा जार भार त्याचे माथा ॥धृपद॥
गोड धड त्यासी ठेवी न मगता । समाधान खाता नेदी मना ॥२॥
खेळता गुंतले उमगूनी आणी । बैसोनिया स्तनी लावी बळे ॥३॥
त्याच्या दुःखेपणे आपणा खापरी । लाही तळी वरी होय जैसी ॥४॥
तुका म्हणे देह विसरे आपुला । आघात तो त्याला लागो नेदी ॥५॥
अर्थ
मुलाचे रक्षण करावे असे आईला कधीही सांगावे लागत नाही तिचा स्वभावच प्रेमाचा असल्याने ती आपोआपच बाळांचे रक्षण करते बाळाचे रक्षण करण्यास ओढ घेते. जो विश्वाचा जनिता ज्याने मला जन्माला घातले त्याच्याच माथ्यावर माझे सर्व जड भार आहे, मग मला कुठलाही विचार करण्याची काहीही गरज नाही. जर घरात आईने गोड धोड पदार्थ केले तर ते पदार्थ आई मुलासाठी जतन करून ठेवते मुलाला सोडून खाणे हे आई समाधानकारक नसते त्यात आईचे समाधानही होत नाही. बालक जर खेळात गुंतलेले असेल तर आई त्याला शोधून आणते आणि आई त्याला खाऊ घालते. जर मुलाला दुःख झाले तर आई त्यांच्या दुखत असते तर जर एखाद्या खापरीत जश्या लाह्या तडतडत असतात, त्या प्रमाणे आईचे चित्त त्या मुला बद्दल तडफडत असते. तुकाराम महाराज म्हणतात मुलांना कसल्याही प्रकारचे आघात त्रास होऊ नये या साठी ती माऊली आपला देह भाव विसरत असते आणि त्या मुलांना जपत असते.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
