नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. ८२४
अग्नि तापलिया काया चि होमे । तापत्रये संतप्त होती । संचित क्रियमाण प्रारब्ध तेथे ।
न चुके संसारस्थिति । राहाटघटिका जैसी फिरता चि राहिली । भरली जाली होती एके रिती ।
साधी हा प्रपंच पंचाय अग्न । तेणे पावसील निजशांती रे ॥१॥
नारायण नाम नारायण नाम । नित्य करी काम जिव्हामुखे ।
जन्म जरा व्याधि पापपुण्य तेथे । नासती सकळ ही दुःखे रे ॥धृपद॥
शीत उष्ण वन सेविता कपाट । आसनसमाधी साधी । तप तीर्थ व्रत दान आचरण।
यज्ञा नाना मन बुद्धी । भोगा भोग तेथे न चुकती प्रकार । जन्मजरादुःखव्याधि ।
साहोनि काम क्रोध अहंकार । आश्रमी अविनाश साधी रे ॥२॥
घोकिता अक्षर अभिमानविधि । निषेध लागला पाठी । वाद करिता निंदा घडती दोष । होय वज्रलेपो भविष्यति ।
दूषणाचे मूळ भूषण तुका म्हणे । सांडी मिथ्या खंती । रिघोनि संता शरण सर्वभावे । राहे भलतिया स्थिती रे ॥३॥
अर्थ
मृत्युं नंतर कायला या देहाला अग्नीने जळतात हे खरे आहे परंतु जिवंत पणे मनुष्य देह नव्हे तर मन व बुद्धी हे त्रिविध तापाने तप्त होतात. संसारता संचित, प्रारब्ध, क्रियमाण, हे चुकत नाहि. रहाटाच्या माळेत मडके फिरत असते, पण त्यात एक मडके फिरत असते आणि दुसरे मडके रिकामे होत असते. प्रपाच्याचे हि तसेच आहे. तू प्रपंच रुपी पंचाग्नी सध्या करून घे म्हणजे तुला शांती मिळेल. तुझ्या जीव्हाने नित्य नारायण नाम स्मरण करत राहा. म्हणजे तुझी जन्म जरा व्याधी पाप पुण्य या सर्वाचा नाश होईल. तुझे दुःख नाश पावतील. शीत उष्ण सेवन केलेस आसना पासून समाधी पर्यंत योग साधना केली ताप तीर्थ योग दान आचरण या सर्वांचे तू अंगीकार केलेस तरी तुझे भोग सुटणार नाही त्या मुळे तू जन्म जरा व्याधी सहन करून काम क्रोध सहन करून अविनाशी आत्मसुख प्राप्त करून घे. तू कितीही वेद पठन केले तरी तुझ्या मागे अभिमान अहंकार हे मागे लागतात आणि शास्त्र विषयी वाद करण्यात कायम निंदा घडत असते, म्हणून हि जी भूषणे आहेत ती दुशानांची करणे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात तू संतांना सर्व भावे शरण जा आणि ज्या स्थितीत तुला सहज राहत येईल त्या स्थितीत तू राहा.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
