नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग – १००३
काय एका जाले ते का नाही ठावे । काय हे सांगावे काय म्हुण ॥१॥
देखतील डोळा ऐकती कानी । बोलिले पुराणी ते ही ठावे ॥धृपद॥
काय हे शरीर साच की जाणार । सकळ विचार जाणती हा ॥२॥
का हे कळो नये आपुले आपणा । बाळत्व तारुण्य वृद्धदशा ॥३॥
का हे आवडले प्रियापुत्रधन । काय कामा कोण कोणा आले ॥४॥
का हे जन्म वाया घातले उत्तम । का हे रामराम न म्हणती ॥५॥
काय भुली यांसी पडली जाणता । देखती मरता आणिकासी ॥६॥
काय करिती हे बांधलिया काळे । तुका म्हणे बळे वज्रपाशी ॥७॥
अर्थ
या संसाराची संगती करून एकेकाची काय दुर्दशा झाली आहे हे लोकांना ठाऊक नाही काय? या लोकांना काय काय म्हणून समजून सांगावे? या संसाराची दुर्दशा हे डोळ्यांनी पाहतात कानाने ऐकतात आणि पुराणात काय सांगितले आहे हे ही त्यांना माहीत आहे. हे शरीर खरे आहे की जाणार आहे हेही सगळ्यांना माहीत आहे. आपले स्वहित कशात आहे हे सगळ्यांना का बरे करू नये आणि बालक व तारुण्य वृद्धावस्था यामध्ये किती दोष आहेत हेही सर्वांना माहीत आहे. आप्तइष्ट हे यांना इतके का आवडले आहेत अखेरीस कोणी कोणाच्या कामाला आले आहे काय? हा उत्तम असा जन्म या लोकांनी का बरे वाया घातला आहे का बरे हे लोक राम राम म्हणत नाहीत? कित्येक लोकं मरताना हे पाहत असतात तरीही या लोकांना या संसाराच्या शाश्वत पानाचा भ्रम पडलेला का आहे? तुकाराम महाराज म्हणतात काळाने आपल्या बलाने या लोकांना वज्रपशाशी बांधले तर हे लोक काय करतील. त्यामुळे नेहमी हरिभजन करावे असे महाराज सांगतात व हरिभजन केल्यानेच आपण तरू शकतो.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
