158, अभंग :- मागे नेणपणे घडले ते क्षमा । आता देतो सीमा करूनिया :- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. 158
मागे नेणपणे घडले ते क्षमा ।
आता देतो सीमा करूनिया ॥१॥
परनारीचे जया घडले गमन ।
दावीतो वदन जननीरत ॥धृपद॥
उपदेशा वरी मन नाही हाती ।
तो आम्हा पुढती पाहू नये ॥२॥
तुका म्हणे साक्षी असो द्यावे मन ।
घातली ते आण पाळावया ॥३॥

अर्थ :-
मागे अजाणतेपणाने तुमच्याकडून काही गुन्हा घडला असेल तर आता पश्चातापाने प्रायश्चित्त घेऊन भक्तीमार्ग धरल्यास आम्ही तुमच्या सर्व चुका माफ करतो. पुन्हा जर अशी परस्त्री अभिलाषा धरल्याचे पाप केले तर मातेशी संग केल्याचे पाप लागेल. चांगला उपदेश केल्यानंतरहि जो सुधारणा करत नाही, त्याचे तोंडहि पाहण्याची आमची इच्छा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही केलेले उपदेश पाळण्याची शपथ तुम्ही स्वतःचे मन साक्षी ठेवून घ्या.

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ गाथा संपूर्ण अभंग सूची

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *