११५, अभंग :- आता केशीराजा हेचि विनवणी ।मस्तक चरणी ठेवीतसे :- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.115

आता केशीराजा हेचि विनवणी ।
मस्तक चरणी ठेवीतसे ॥१॥
देह असो माझा भलतिये ठायी ।
चित्त तुझ्या पायी असो द्यावे ॥धृपद॥
काळाचे खंडण घडावे चिंतन ।
तनमनधन विन्मुखता ॥२॥
कफवातपित्त देहअवसानी ।
ठेवावी वारूनि दुरिते ही ॥३॥
सावध तो माझी इंद्रिये सकळ ।
दिली एका वेळे हाक आधी ॥४॥
तुका म्हणे तू या सकळांचा जनिता ।
येथे ऐक्यता सकळांसी ॥५॥

अर्थ

हे केशीराजा तुझ्या चरणी मस्तक ठेऊन मी अशी विनंती करीत आहे की,माझा देह कोणत्याही ठिकाणी असो मात्र चित्त फक्त तुझ्या चरणी असू द्यावे.तन मन धन या बाबतीत माझे मन विन्मुख होऊन माझा सर्व काळ तुझ्या चिंतनात जावा.कफ वात व पित्त हे माझ्या देहात असून अंतःकाळी तुम्ही ते निवारण करावे.जो पर्यंत माझी इंद्रिये सावध आहे तो पर्यंतच एक वेळा तुम्ही मला हाक मारा.तुकाराम महाराज म्हणतात देवा सकळांचा जनिता निर्माता तुच आहे आणि सगळे तुझ्यातच ऐक्य पावणार आहे.

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ गाथा संपूर्ण अभंग सूची

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading