२०२, अभंग :- ऐसे ऐसियाने भेटती ते साधु । ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू :- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. 202
ऐसे ऐसियाने भेटती ते साधु । ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू ।
जे का सिच्चदानंदी नित्यानंदु । जे का मोक्षसिद्धी तीर्थ वंदू रे ॥१॥
भाव सर्वकारण मूळ वंदु । सदा समबुद्धि नास्तिक्य भेदु ।
भूतकृपा मोडी द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र सम करी बंधु रे ॥धृपद॥
मन बुद्धि काया वाचा शुद्ध करी । रूप सर्वत्र देखोनि नमस्कारी ।
लघुत्व सर्वभावे अंगीकारी । सांडीमांडी मीतूपण ऐसी थोरी रे ॥२॥
अर्थकामचाड नाही चिंता । मानामान मोह माया मिथ्या ।
वर्ते समाधानी जाणोनि नेणता । साधु भेट देती तया अवचिता रे ॥३॥
मनी दृढ धरी विश्वास । नाही सांडीमांडीचा सायास ।
साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो विटला जाणीवेस रे ॥४॥

अर्थ
जे आपल्या आनंदात निमग्न असतात, इश्वरचिंतनात ध्यानमग्न असतात त्यांच्या ठिकाणी नेहमीच सच्चिदानंद पद असते, त्यांच्या पायाशी सर्व तीर्थ व मोक्ष असतो अश्या साधुंच्या दर्शनाने सर्व पाप नाहीसे होतात व भव बंध तुटतात. त्यांच्या ठिकाणी तू एकनिष्ठ भक्तिभाव ठेव कारण, त्यांच्या ठिकाणी स्थीरबुद्धि , नास्तिक्यभेद करणारी बुद्धि आहे. भूतदया धर मनातील द्वेषाचा कांदा फोडून टाक, शत्रु, मित्र, पुत्र या सर्वा प्रती समभाव धरअरे तू सर्वभावे लहानपणाचा अंगीकार कर अरे तू मी तू पणा चा लहान मोठेपणा चा त्याग कर. शरीर, वाणी, मन आणि बृद्धि शुद्ध असावी. सर्वत्र विठ्ठालाचे स्वरुप पहावे , विनम्रता असावी, अहंकार नसावा. ज्याच्या मनी धन, कामवासना नाही, मान सन्मानाचा मोह नाही , जो समाधानी वृत्तीचा आहे, त्याला संतसज्जन आनंदाने भेटतात. तुकाराम महाराज म्हणतात, मनामध्ये विठ्ठलाविषयी दृढ विश्वास धरा, आणि जो इतर कोणताही खटाटोप करीत नाही व जो प्रपंच्याला विटला आहे, ज्याने आवड निवड टाकून दिली आहे, त्याला संत सज्जन नित्य भेट देतात साधू दर्शन नित्य घडते.

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १ ते १००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *