१३६, अभंग :- ऐसा हा लौकिक कदा राखवेना । पतितपावना देवराया :- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.136

ऐसा हा लौकिक कदा राखवेना ।
पतितपावना देवराया ॥१॥
संसार करिता म्हणती हा दोषी ।
टाकिता आळसी पोटपोसा ॥धृपद॥
आचार करिता म्हणती हा पसारा ।
न करिता नरा निंदिताती ॥२॥
संतसंग करिता म्हणती हा उपदेशी ।
येरा अभाग्यासि ज्ञान नाही ॥३॥
धन नाही त्यासि ठायींचा करंटा ।
समर्थासि ताठा करिताती ॥४॥
बहु बोलो जाता म्हणति हा वाचाळ ।
न बोलता सकळ म्हणती गर्वी ॥५॥
भेटिसि नवजाता म्हणती हा निष्ठुर ।
येता जाता घर बुडविले ॥६॥
लग्न करू जाता म्हणती हा मातला ।
न करिता जाला नपुंसक ॥७॥
निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ ।
पातकाचे मूळ पोरवडा ॥८॥
लोक जैसा लोक धरिता धरवे ना ।
अभक्ता जिरे ना संतसंग ॥९॥
तुका म्हणे आता ऐकावे वचन ।
त्यजुनिया जन भक्ति करा ॥१०॥

अर्थ

पतितपावना देवराया संतपदाचा लौकिक सदासर्वकाळ सांभाळने शक्य होत नाही . एखादा मनुष्य प्रपंच करताना “हा स्वार्थी दोषी आहे” आणि प्रपंच टाकून परमार्थ करू जावे “तर हा अळशी आहे”, असे लोक म्हणतात .धर्मा प्रमाणे आचारण केले तर दांभिक म्हणतात, नाही केले तर पाखंडी म्हणून निंदा करतात .संतांच्या सहवासात राहून शास्त्राभ्यास केला तर चेष्टा करतात, नाही केला तर हा अभागी आहे, याला संत सहवास, शास्त्राभ्यास घडणार नाही असे म्हणतात .दरिद्री माणसाला कमनाशिबि म्हणतात, तर श्रीमंताला अहंकार फार आहे, असे म्हणतात .बोललो तर बडबड करणारा आणि नाही बोललो तर गर्विष्ट म्हणतात .नातेवाइकाना भेटण्यास नाही गेलो तर निष्टुर आणि गेलो तर नेहमी घरी येऊन आम्हाला बुडवितो एशे म्हणतात .लग्न करू पाहता मस्तिला आला म्हणतात आणि लग्न न करता राहीला तर ‘नपुंसक’ म्हणतात .निपुत्रिकाला पापी म्हणतात आणि मुले बाळ झाली तर पापाचे कारण म्हणून हा पोरवडा वाढला म्हणतात .लोक हे असे दोन्हीकडून बोलतात, जाशी ओकारी थांबवता येत नाही तसे लोकांचे बोलनेही थांबवता येत नाही .म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, की लोकांच्या बोलाण्याकडे दुर्लक्ष करून भक्तीच्या मार्गाकडे वाटचाल चालू ठेवा.

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ गाथा संपूर्ण अभंग सूची

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

One comment

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading