१२७, अभंग :- काखे कडासन आड पडे ।खडबड खडबडे हुसकले :- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.127

काखे कडासन आड पडे ।
खडबड खडबडे हुसकले ॥१॥
दादकरा दादकरा ।
फजितखोरा लाज नाही ॥धृपद॥
अवघा झाला राम राम ।
कोणी कर्म आचरे ना ॥२॥
हरीदासांच्या पडती पाया ।
म्हणती तया नागवावे ॥३॥
दोही ठायी फजीत झाले ।
पारणे केले अवकळा ॥४॥
तुका म्हणे नाश केला ।
विटंबिला वेश जेणे ॥५॥

अर्थ

एक कर्मठ ब्रम्हच्याऱ्याच्या बगलेत हरणाचे कातडे होते.वाटेत अडखळल्यामुळे ते खाली आडवे पडले आणि खडबड खडबड असा आवाज झाला .तो ब्रम्हचारी, अश्या फजितखोरांना मुळात लाज लज्याच नाही वा त्याची तूम्ही काही तरी दाद करा त्याची चांगली फजीती करा . तो ब्रम्हचारी म्हणु लागला की,देहु मध्ये सर्व जण मुखाव्दारे रामराम असेच म्हणतात कुणीही कर्माचरण आचरित नाही .तो म्हणतो हरिदासांच्या चरणावर जे मस्तक ठेवतात, त्यांना नागवावे .दोन्ही ठिकाणी(संसार व परमार्थ) फजीती झाल्यामुळे त्यांना अवकाळा प्राप्त झाली आहे .तुकाराम महाराज म्हणतात, या ब्रम्हचारी लोकांनी ब्रम्हचारी वेषाची वीटंबना केली आहे आणि स्वत:चा नाश करून घेतला आहे .

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ गाथा संपूर्ण अभंग सूची

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *