१२५, अभंग :- न देखोनि काही।म्या पाहिले सकळ ही :- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.125

न देखोनि काही ।
म्या पाहिले सकळ ही ॥१॥
झालो अवघियांपरी ।
मी हे माझे ठेले दुरी ॥धृपद॥
न घेता घेतले ।
हाते पाये उसंतिले ॥२॥
खादले न खाता ।
रसना रस झाली घेता ॥३॥
न बोलोनि बोले ।
केले प्रगट झांकिले ॥४॥
नाइकिले कानी ।
तुका म्हणे आले मनी ॥५॥

अर्थ

काही न पाहता मी विश्वातील सर्व पाहत आहे .कारण मी माझा देहभान, देहबुध्दी विसरलो आणि विश्वतत्त्वाशी एकरूप झालो आहे .म्हणून मी विश्वातील सर्व वास्तु पाहू शकलो व् स्थुल देहाच्या हात व पायांनी ज्याचा त्याग केला आहे ते सर्व स्वस्वरुपात मिळाले आहे .काही न खाता सर्व भोजनांचा रसस्वाद घेतला आहे .कुणाशी न बोलता सर्वांशि बोललो आहे आणि जे गुप्त आत्मज्ञान होते ते उघड केले आहे .तुकाराम महाराज म्हणतात, कानांनी जे एकता नाही आले ते सर्व आइकले आहे.ही आत्मस्वरूपाची ओळख आहे .

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ गाथा संपूर्ण अभंग सूची

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading