७, अभंग :- सुखे वोळंब दावी गोहा । माझे दुःख नेणा पाहा :- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang

संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.७

सुखे वोळंब दावी गोहा ।
माझे दुःख नेणा पाहा ॥१॥
आवडीचा मारिला वेडा ।

होय कैसा म्हणे भिडा ॥धृपद॥
अखंड मज पोटाची व्यथा ।

दुधभात साकर तूप पथ्या ॥२॥
दो पाहरा मज लहरी येती ।

शुद्ध नाही पडे सुपती ॥३॥
नीज नये घाली फुले ।

जवळी न साहती मुले ॥४॥
अंगी चंदन लाविते भाळी ।

सदा शूळ माझे कपाळी ॥५॥
निपट मज न चले अन्न ।

पायली गहू सांजा तीन ॥६॥
गेले वारी तुम्ही आणिली साकर ।

साता दिवस गेली साडेदहा शेर ॥७॥
हाड गळोनि आले मास ।

माझे दुःख तुम्हा नेणवे कैसे ॥८॥
तुका म्हणे जिता गाढव केला ।

मेलियावरी नरका नेला ॥९॥

अर्थ
एक भोगवादी स्त्री हि नवऱ्याला म्हणते खरे तर ती सुखी असते पण ती सोंग आणते आणि म्हणते तुम्ही माझे काही दुःख पाहत नाही मग तो पती तिच्या आवडीने वेडा झाल्या मुळे तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो.ती स्त्री त्या नवऱ्याला म्हणते मला अखंड पोटाची व्यथा आहे त्यामुळे त्याला पथ्य म्हणजे दुध तूप साखर घालून भात खावा लागेल.आहो मला दुसऱ्या प्रहराला चक्कर येते आणि मी बेशुध्द पडते मला शुध्द राहत नाहीव त्या मुळे मला झोप लागत नाही.मला माझ्या खाली फुले टाकल्यावर झोप येते व हि माझी मुले माझ्या जवळ असल्यावर किरकिर करतात त्यामुळे ते मला सहन होत नाही.नाटक करत ती त्याला म्हणते कि मला कपाळ शूळ आहे त्यामुळे मी अंगाला व कपाळाला चंदन लावते.साधे अन्न मला जमत नाही मला तीन पायली गव्हाचा सांजा लागतो.गेल्या आठवड्या मध्ये तुम्ही जी साडे दहा शेर साखर आणली ती सातच दिवस गेली.आहो माझे हाडे बारीक होऊन माझे मांस वाढले केव्हढे माझे हे दुख आहे हे तुम्हाला कळत कसे नाही?तुकाराम महाराज म्हणतात अश्या प्रकारे त्या माणसाचा जिवंत पणे गाढव केला आणि मेल्यावर तो नरकाला गेला.

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १ ते १००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १ ते १००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *