९, अभंग :- जेविले ते संत मागे उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी झाडा :- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang


संत तुकाराम महाराज सार्थ अभंग ९

अभंग क्र.९

जेविले ते संत मागे उष्टावळी ।
अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ॥१॥
सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा ।

पासूनि सकळा अवघ्या दुरी ॥धृपद॥
परे परते मज न लागे सांगावे ।

हे तो देवे बरे शिकविले ॥२॥
दुसर्‍याते आम्ही नाही आतळत ।

जाणोनि संकेत उभा असे ॥३॥
येथे कोणी काही न धरावी शंका ।

मज चाड एका भोजनाची ॥४॥
लांचावला तुका मारितसे झड ।

पुरविले कोड नारायणे ॥५॥

अर्थ
संतसज्जनांच्या ज्ञानरूपी उष्ट्या भोजनाची मी अपेक्षा करतो आहे .मी सोवळे-ओवळे या कल्पनेच्या पलीकडे गेलो आहे .ब्रम्हरूपाचे तत्वज्ञान मला इतरांनी संगावयाचे कारण नाही; कारण प्रत्यक्ष भगवंताने मला ते सांगितले आहे .आमच्यामध्ये द्वैतभाव नाही म्हणून प्रत्येक्ष भगवंत आमच्या पाठीमागे उभा आहे .मी संतांच्या उच्छिष्टाच्या भोजनाची इच्छा बाळगत आहे.म्हणुन कोणीहि मनामधे शंका धरु नये .तुकाराम महाराज म्हणतात की, प्रत्यक्ष भगवंतनेच लालचवलेल्या माझ्या मनाची ही इच्छा पूर्ण केली आहे .

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १ ते १००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १ ते १००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *