९७, अभंग :- काही नित्यनेमाविण । अन्न खाय तो श्वान ।:- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang 1

संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.९७

काही नित्यनेमाविण ।
अन्न खाय तो श्वान ।

वाया मनुष्यपण ।
भार वाहे तो वृषभ ॥१॥
त्याचा होय भूमी भार ।
नेणे यातीचा आचार ।
जाला दावेदार ।
भोगवी अघोर पितरांसि ॥धृपद॥
अखंड अशुभ वाणी ।
खरे न बोले स्वप्नी ।
पापी तयाहुनी ।
नाही आणीक दुसरा ॥२॥
पोट पोसी एकला ।
भूती दया नाही ज्याला ।
पाठी लागे आल्या ।
अतिताचे द्वारेशी ॥३॥
काही संतांचे पूजन ।
न घडे तीर्थांचे भ्रमण ।
यमाचा आंदण ।
सीण थोर पावेल ॥४॥
तुका म्हणे त्यांनी ।
मनुष्यपणा केली हानी ।
देवा विसरूनी ।
गेली म्हणता मी माझे ॥५॥

अर्थ

दररोज कही पारमार्थिक नित्यनेम केल्यावाचुन जो अन्न खातो, तो कुत्र्या सामान असतो, मनुष्यदेहाचा भार वाहणारा तो निव्वळ बैल असतो .त्याचा भूमिला भार होतो, त्याचे आचरण शुद्ध नसते; त्यामुळे त्याचे पितर नारकवास भोगत असतात .त्याची वाणी अमंगळ असते, तो स्वप्नात सुध्दा खरे बोलत नाही, त्याच्यासारखा पापी शोधून सपडणार नाही .तो फक्त आपल्या कुटुंबाचे पोट भरतो, त्याच्याजवळ भूतदया नाही, दाराशी आलेल्या अतिथीला हाकलुन देतो .त्याच्या हातून संतसेवा, तीर्थयात्रा घडत नाही, तो म्हणजे यमाला दिलेला एक ठेवा आहे, यम त्याला भरपूर दुःख देईल .तुकाराम महाराज म्हणतात , अश्या व्यक्ती जन्माला येऊन स्वत:चेच नूकसान करून घेतात; कारण प्रपंच्यात ते रमुन जातात, त्यांना परमेश्वराची आठवण येत नाही .

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १ ते १००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १ ते १००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *