९१, अभंग :- देखोनि पुराणिकांची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी:- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang 91

संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.९१

देखोनि पुराणिकांची दाढी ।
रडे स्फुंदे नाक ओढी॥१॥
प्रेम खरे दिसे जना ।
भिन्न अंतरी भावना ॥धृपद॥
आवरीता नावरे ।
खुर आठवी नेवरे ॥२॥
बोलो नये मुखावाटा ।
म्हणे होता ब्यांचा तोटा ॥३॥
दोन्ही सिंगे चारी पाय ।
खुणा दावी म्हणे होय ॥४॥
मना आणिता बोकड ।
मेला त्याची चरफड ॥५॥
होता भाव पोटी ।
मुखा आलासे शेवटी ॥६॥
तुका म्हणे कुडे ।
कळो येते ते रोकडे ॥७॥

अर्थ

एका मंदिरात पुराणिकाचे पुराण ऐकतांना एक धनगर स्फुंदुन स्फुंदुन रडत असे .लोकांना वाटे, तो पुराणीकांवरील श्रद्धेमुळे राडतो आहे, पण त्याला पुराणीकांची दाढ़ी पाहुन आपल्या बोकडयाची आठवण येत असे .त्याला बोकडयाचे खुर, पाय आठवत असत .इतर सर्व शेळ्यान मधे हा एकच बोकड होता .पुराणीकांने माया आणि ब्रम्ह अशी दोन बोटे वर केली की त्याला वाटे, बोकडाचि दोन शिंगे, चार वेदांसाठी त्यांनी चार बोटे वर केली की त्याला वाटे, बोकडयाचे चार पाय; या साठी या खुना आहेत .धनगराला मेलेल्या बोकडयाची आठवण येत असे .पुराणीकांना पाहुन धनगराला मेलेला बोकड आठवला, हा त्याच्या मनातील भाव शेवटी बाहर पडला .तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंचिक मनुष्याच्या अंत:करणात काही लपुन राहत नाही, सत्य बाहर पडते .

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १ ते १००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १ ते १००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *