२१, अभंग :- विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ :- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang 1

संत तुकाराम महाराज सार्थ अभंग २१

अभंग क्र.२१

विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
अइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल ते हित सत्य करा ॥धृपद॥
कोणा ही जिवाचा न घडावा मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे ॥२॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥

अर्थ
हे जग विष्णुमय आहे, वैष्णव हा एकच धर्म सर्वत्र आहे, माणसामाणसांमध्ये भेद करने ही अमंगल बाब आहे .हे भक्तजनहो, तुम्ही भगवंतचे श्रवण, चिंतन करून आपले हित साधुन घ्या .आपल्या हातून कोण्याही जीवाचा मत्सर घडू नये, हीच खरी ईश्वर भक्ति आहे .तुकाराम महाराज म्हणतात, की शरीच्या कुठल्याही अवयवाला दुःख झाले तर ते संपुर्ण शरीराला, तसेच शरीरातील जीवाला जाणवते त्याप्रमाणे विष्णुमय जगातील कोणत्याही जीवाचा मत्सर आपल्या हातून घडला असता तो इश्वराचा मत्सर केल्यासारखा आहे .

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १ ते १००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १ ते १००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *