संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा ९१ ते ९५

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

हें व्यापूनि निराळा भोगी वैकुंठ सोहळा अभंग क्रं.९१

हें व्यापूनि निराळा भोगी वैकुंठ सोहळा । नंदाघरीं गोपाळा हरि माझा ॥
न साहे सगुण अवघाचि निर्गुण । तो कृष्ण आपण गोपाळवेषें ॥
गायी चारी हरि मोहरी खांद्यावरी । वेणु नाना परि वातु असे ॥
निवृत्ति गयनी कृपा जपतो अमुप जाण । सांगीतली खुण गोरक्षाने ॥

अर्थ: वैकुंठात सुख भोगणारा हा परमात्मा सर्व जागा व्यापुन ही त्या पासुन निराळा आहे तोच परमात्मा गोपाळ बनुन नंदा घरी आला आहे. तो गोपाळ वेशातील कृष्ण जरी सगुण दिसत असला तरी तो कायम सगुण राहात नाही. आपले विहीत कार्य झाले की तो निर्गुणातच जातो. तो परमात्मा कृष्ण बनुन गायी चारताना खांद्यावर घोंगडी घेऊन वेणुतुन अनुहत नाद निर्माण करत आहे. त्या मुळे चराचर मोहरुन गेले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गोरक्षनाथानी गहिनीनाथाना जे गुह्य ज्ञान दिले ते मला ही गहिनीनाथांच्या कृपाप्रसादामुळे प्राप्त झाले आहे.

न साहे दुजेपण आपण आत्मखुण अभंग क्रं.९२

न साहे दुजेपण आपण आत्मखुण । श्रुतीही संपुर्ण हारपती ॥
वेदरुप श्रीकृष्ण योगिया जीवन । ते रुप परिपूर्ण आत्माराम ॥
न दिसे वैकुंठी योगिया ध्यानबीज । तो गोपाळांचे काज हरि करी ॥
निवृत्ति गयनी हरि उच्चारिता । माजि करि मनोरथ पुरी कामसिध्दी ॥

अर्थ: श्रुतींची ताकत ज्या स्वरुपाचे वर्णन करताना हरपते ते परमात्म स्वरुप द्वेताला नाकारत एकत्वाने अद्वैत स्वरुपातच राहते. तो परिपूर्ण असणारा परमात्मा वेदांचे स्वरुप व योगियांचे निजध्यान आहे. जो परमात्मा वैकुंठात दिसत नाही. जो योगियांच्या ध्यानात ही सापडत नाही. तो गोकुळात गोपाळांची काम करत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथांच्या सह हरिनाम उच्चारल्यामुळे मनाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात कार्य सिध्दी होते.

नाही हा आकार नाही हा विकार अभंग क्रं.९३

नाही हा आकार नाही हा विकार । चतुर्भुज कर हरि माझा ॥
हरिरुप पै जप हरिहररुप । गौळियांचें रुप सहज कृष्ण ॥
हरिरुप घरीं सोळासहस्त्र नारी । तो बाळ ब्रह्मचारी गाई राखे ॥
निवृत्ति रोकडे ब्रह्म माजिवडें । तो य़शोदे पुढे लोणी मागे ॥

अर्थ: तो चतुर्भुज परमात्मा जरी सगुण दिसत असला तरी त्याला रुप नाही व त्याच्यात दोषांचा लवलेश ही नाही. गोपाळांत असलेल्या कृष्णामध्ये हरि व हराचे एकत्व आहे. जो कृष्ण गायी चारताना दिसतो त्याला सोळा सहस्त्र बायका आहेत तरी तो परमात्मा ब्रह्मचारी आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, तेच सगुण सर्वव्यापक परब्रह्म यशोदेकडे लोणी मागत आहे.

जिथुनि उग्दारु प्रसवे ऊँकारु अभंग क्र.९४

जिथुनि उग्दारु प्रसवे ऊँकारु । तोचि हा श्रीधरु गोकुळीं वसे ॥
जनकु हा जगाचा जीवलगु साचा । तो हरि आमुचा नंदाघरी ॥
नमाये वैकुंठी योगीयांचे भेटी । पहाता ज्ञानदृष्टी नये हाता ॥
निवृत्ति म्हणे देवा म्हणविता हे रावो । तो सुखानुभवो यादवांसी ॥

अर्थ: जो ओंमकार प्रणव जे सृष्टीचे आद्यतत्व आहे तेच श्रीधर बनुन गोकुळात वास करत आहे. जो नंदा घरी नांदतो आहे तो श्रीकृष्ण ह्या जगाचा जनक म्हणजे आहे. हे परब्रम्ह योग्यांच्या धान्यात पकडले जात नाही वैकुंठात मावत नाही व ज्ञान्यांच्या हाताला लागत नाही.निवृत्तिनाथ म्हणतात, यादव ज्याला राजा मानतात तो देव त्याच गोपाळांचा सुखानुभव आहे.

योगियांचे धन ते ब्रह्म संपन्न अभंग क्र.९५

योगियांचे धन ते ब्रह्म संपन्न । तो हा जनार्दन नंदाघरी ॥
हरीरूप माये सर्वाघटी आहे । दूध लोणी खाये गौळियांचे ॥
चिंति अजामेळा नाम आले मुखा । तो वैकुंठीच्या सुखा देत हरि ॥
निवृत्तिचे धन जगाचे जीवन । नाम नारायण तरुणोपाव ॥

अर्थ: त्या परब्रम्हाची प्राप्ती म्हणजे महाधन मानणारे योगी त्यांना हा सहज मिळत नाही पण हा जनार्दन नंदा घरी अवचित आला आहे. जे सर्वांघटी भरलेले आहे असे ते परब्रम्ह गौळ्यांचे दुध लोणी खात आहे. त्या महापापी अजामेळा त्यांनी शेवटी घेतलेल्या नामामुळे वैकुंठाला पोहचला.तोच परमात्मा हा वैकुंठाचे सुख गोकुळात देतो आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, ते नाम घेतले तर ते त्रैलोक्याला तारते ते नारायण नाम माझा ठेवा आहे.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading