संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा ५६ ते ६०

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

आदिरुप समूळ प्रकृती नेम अभंग क्र.५६

आदिरुप समूळ प्रकृती नेम । वैकुंठ उत्तम सर्वत्र असे ॥ 
तें रुप संपूर्ण वोळले परींपूर्ण । सर्व नारायण गोपवेष ॥
आधारी धरिता निर्धारी धरिता । सर्वत्र पुरता एकरुपें ॥
निवृत्ति साधन सर्वरुपें जाण । एतरुपें श्रीकृष्ण सेवितसे ॥

अर्थ: एकट्या परब्रह्माला जेंव्हा एकटेपण जाणवतो तेंव्हा तो प्रकृती तयार करुन जगतरुपी वैकुंठ तयार करतो. तोच परमात्मा गायी गोपाळांच्या जागी अंशात्मक रुपाने आला व संपुर्ण जगाताचे रुप परिपुर्ण केले. योग्यांनी निर्धारानी धारण केलेल्या ध्यानातुन सर्वत्र तोच अनेक रुपाने प्रकट होतो. निवृत्तिनाथ म्हणतात तोच परमात्मा जरी अनेक रुपानी प्रगट झाला तरी श्रीकृष्ण रुपात त्याला एकत्वाने पाहता येते.

वैकुंठ कैलास त्यामाजी आकाश अभंग क्र.५७

वैकुंठ कैलास त्यामाजी आकाश । आकाश अवकाश धरी आम्हा ॥ 
तें रुप सुचड प्रत्यक्ष उघड । गौळियांसी कोड कृष्णरुप ॥
न दिसे निवासा आपरुपे दिशा । सर्वत्र महेशा आपरुपे ॥
तारक प्रसिद्ध तीर्थ पै अगाध । नामाचा उद्बोध नंदाघरी ॥
प्रकाशपूर्णता आदिमध्य सत्ता । नातळे तो द्वैताद्वैतपणे ॥
निवृत्ति साधन कृष्णरुपे खुण । विश्वीं विश्वपूर्ण हरि माझा ॥

अर्थ: वैकुंठलोक व कैलासलोक ज्या अवकाशात आहे त्यांने आम्हाला धारण केले आहे. तो ज्या जगत स्वरुपात प्रगट झाला तेच कृष्णरुप आहे हे पाहुन गौवळी त्याचे कोड पुरवत आहेत. त्याच्या निवास पाहु गेले तर तो सर्वत्र जगत स्वरुपात दिसतो व सुक्ष्म रुपात पाहिले तर स्वतःत दिसतो. जी तीर्थे उध्दाराचे काम करता करता लोप पावली त्यांना तो नंदाघरच्या कृष्ण नामाने जागृत करतो. प्रकाशाची पूर्णता त्याच्याकडे आहे आदि मध्य अंतावर त्याचे राज्य आहे व तो द्वैता अद्वैतात सापडत नाही. निवृत्तिनाथ म्हणतात तो परमात्मा चराचरात असुन सर्व विश्वात विश्व होऊन असतो.

निरशुन्य गगनी अर्क उगवला अभंग क्र.५८

निरशुन्य गगनी अर्क उगवला । कृष्णरुपे भला कोंभ सरळु ॥
ते रुप सुंदर गौळियांचे दृष्टी । आनंदाचि वृष्टी नंदाघरी ॥
रज तमा गाळी दृष्याकार होळी । तगाकार कळी कृष्ण बिंबे ॥
निवृत्ति साकार शून्य परात्पर । ब्रह्म हे आकार आकारले ॥

 
अर्थ: शुन्यवत नसलेल्या अवकाशत एक प्रकाशमान सुर्य अवतरला व तोच श्रीकृष्ण रुपात कोंभ पावले. त्या गौळ्यांच्या दृष्टीने सावळ्या सुंदर असलेल्या कृष्णाने नंदाघरी आनंदाचा पाऊस पाडला. त्याच कृष्ण रुपावर एकत्व केल्यावर दृष्याकार रजो व तमो गुणांची होळी होते. सत्व कृष्ण रुपाने उरते.निवृत्तिनाथ म्हणतात ते रुप परात्पर शुन्या पलिकडील आहे व तेच कृष्ण रुपाने साकारले आहे.

निरालंब सार निर्गुण विचार अभंग क्र.५९

निरालंब सार निर्गुण विचार । सगुण आकार प्रगटला ॥
ते रुप सुंदर शंखचक्रांकित । शोभ अनंत यमुनातटी ॥
अपाय उपाय आपणचि होय । सिध्दीचा न साहे रोळु सदा ॥
सर्व हे घडले कृष्णाचे सानुले । घटमठ बुडाले इये रुपी ॥
सर्वसुखमेळे नामाकृती वोळे । सिध्दिचे सोहळे कृष्णनामी ॥
निवृत्ति तटाक घट मठ एक । कृष्ण हा सम्यकु नामरुपे ॥

अर्थ: जे परब्रम्ह कोणावर अवलंबुन नाही ते निर्गुण आहे ते सगुण होऊन साकारले. शंखचक्रगदा घेऊन ते सुंदर रुप घेऊन यमुना तटी आले. जो अपायांवर उपाय आहे.त्याकडे येण्यास अष्टमा सिध्दी ही स्वतःला रोखु शकल्या नाहीत. कृष्ण रुपात ज्या लिला केल्या त्यामुळे भगवान लहान दिसत असले तरी अमर्याद शक्ती ठेऊन असतो. त्याच्या त्या सानुल्या रुपात घट मठादी सिध्दांत लोप पावले. हे कृष्ण नाम घेतलावर सर्व सुखाची प्राप्ती तसेच सर्व सिध्दी ही आपसुक मिळतात. निवृत्तिनाथ म्हणतात त्याच्या नामप्रभावामुळे घट व मठातील पोकळी ही भरते म्हणजे सिध्दांत सिध्द होतात.हे सामर्थ त्या कृष्ण नामात आहे.

ज्या नामे अनंत न कळे संकेत अभंग क्र.६०

ज्या नामे अनंत न कळे संकेत । वेदाचाही हेत हारपला ॥
ते रूप सानुले यशोदे तान्हुले । भोगिती निमोले भक्तजन ॥
अनंत अनिवार नकळे ज्याचा पार । जेथे चराचर होते जाते ॥
निवृत्तिसंकेत अनंताअनंत । कृष्णानामे पंथ मार्ग सोपा ॥

अर्थ: अनंत नाम असणाऱ्या परमात्याचे यथार्थ वर्णन करायला वेदांचा ही विचार खुंटला. तो परमात्मा यशोदेच्या घरी तान्ह्या रुपात आल्यावर भक्तांना ही विनासायास त्याचा लाभ झाला.अनंत व अनिवार रुपाच्या परमात्माचा पार लागत नाही.त्याच्यात अनेक चराचरे घडत व बिघडत असतात निवृत्तिनाथ म्हणतात अनंत असलेला परमात्मा जाणण्याचा उपाय म्हणजे कृष्णनामपंथ होय.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading