👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग ८७
आलिया जवळा भक्तिसुख देखे । पालव पोखे वाणिव भोगी ॥ तें सुख आम्हां विठ्ठल चरणी । निवृत्ति करणी व्यासाचिये ॥ जप तप ज्ञान क्रिया कर्म धर्म । रामकृष्ण नेम गुरु भजने ॥ ज्ञानेदेवो म्हणे संसार निरसी । अखंड मानसी विठ्ठल हरि ॥
अर्थ:-
भक्तिचा आनंद काय असतो व तो कसा भोगायचा तर संतांच्या जवळच जावे लागते. निवृत्तिनाथ व व्यांस ह्यांच्या कृपेमुळे हे सुख मला विठ्ठल चरणाजवळ सापडते. जप तप हा ज्ञान व कर्म मार्ग आहे व त्यामुळे रामकृष्णांचे भजन गुरुकृपेने करता येते. सतत विठ्ठलाला मनात स्मरल्यास संसाराचा निरास होतो असे माऊली सांगतात.