ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 856

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके हमामा अभंग ८५६

हमामा घाली बाळा । सांडी खोटा चाळा । फोडीन तुझा टाळा । वाकुल्या दावीन काळा ॥१॥ हमामा रे पोरा हमामा रे ॥ध्रु. ॥ हमामा घालीं बा रे । अंगीं भरलें वारें । चाखती पिकली चारें । जाऊं वरील्या द्वारें रे पोरा ॥२॥ हमामा घालीं नेटें । सांडी बोलणे खोटें । आतां जासील कोठे । कान्होबाचे बळ मोठे रे पोरा ॥३॥ हमामा घालीं सोई । सांभाळी सवा दोहीं । एक नेमें तूं राहीं । तेथें बहु सुख पाहीं रे पोरा ॥४॥ हमामियाचा नादं वाजे । अनुहातें कोपर गाजे । बापरखुमादेविवरु विठ्ठलु राजे । रत्नजडित मुगुट साजे रे पोरा ॥५॥

अर्थ:-

हमामा घाल.प्रपंचाचा खोटा चाळा सोडून दे. देहाभिमानाचा तुझा खोटा चाळा आहे. त्यामुळे काळ नाश करतो. परंतु त्या देहाभिमानाचे टाळके फोडून बाध कर म्हणजे तुझा नाश करणाऱ्या काळाला वाकुल्या दाखव. हमामा रे पोरा हमामा हमामारे पोरा हमामा. हमामा घाल हमामा घालू लागले असता अंगांत वारे भरते. त्या वाऱ्याच्या नादांने रानांतील चारा खाते. तो खाण्यांकरिता आपल्या वरल्या दाराने म्हणजे कामी मुखाच्या दाराने वरती जाऊ.चांगल्या रितीने हमामा घाल. खोटे बोलणे टाकून दे. असे केले म्हणजे. हा कान्होबा मोठा बलवान आहे. तो आपल्याशी तुझे ऐक्य करुन घेईल. असे झाले म्हणजे मग कोठे जाशील. हमामा अशा सोयीने घाल की. ज्याच्या दोन्ही बाजू सांभाळल्या जातील. परमात्मस्वरुपांविषयी एक नेम करुन तूं राहिलास तेथे फार सुख आहे हमाम्याचे नादाने पोरे हात नाचवून, तोंडाने कांही आवाज करीत असतात. परंतु या हमाम्यांत अनुहात. ध्वनीची गर्जना होते. तोच नांद वाजत असतो. ज्याच्या मस्तकांवर रत्नजडित मुकुट शोभत आहे. असा जो, माझे पिता व रखुमाईचे पती, श्रीविठ्ठलराय स्वरूपांच्या ठिकाणी हा हमामा घालावयाचा आहे. असे माऊली सांगतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading