ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 840

👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१२ वे, स्वरूपस्थिती अभंग ८४०
अवघा सुखरूप अवघाची रूपीं । अवघाची आपी धरूनी ठेला ॥१॥ नाम तें अवघे उच्चारिसी वेगें । येर तें वाउगें कर्महीन ॥२॥ निवृत्ति गुरुप्रसादें नामी निमग्न । नाम म्हणतां यज्ञ कोटी रया ॥३॥
अर्थ:-
जलस्थलादि सर्व रूपवान पदार्थात परिपूर्ण असा एक आत्मा भरलेला आहे.ईश्वर नामोच्चार करशील तर तूं तद्रुप होशील. ज्यांना ही नामोच्चाराची सोपी वाट कळत नाही. ते कर्महिन समजावे. मी निवृत्तिरायांच्या कृपाप्रसादाने त्या नामस्मरणात दंग होऊन गेलो. त्या भगवंताचे एकवेळ नाम घेतले तरी कोटी यज्ञ केल्याचे पुण्य आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.