ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 817

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१० वे, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ८१७

निमिष नलगे मन वेधिता । येवढी तुझी स्वरूपता ॥१॥ विठोबा नेणों कैसी भेटी । उरणें नाहीं जीवेसाठी ॥२॥ उरलें उपाधी कारणे । तें त्वां नेमिलें दरूशनें ॥३॥ निवृत्तिदासा वेगळें । सांगावया नाही उरलें ॥४॥

अर्थ:-

हे श्रीकृष्णा, तुला पाहिल्यावर एका क्षणाचाही विलंब न होता तुझ्या स्वरूपाचा आमच्या मनाला वेध लागून जातो. एवढी तुझ्या स्वरूपाची योग्यता आहे.तुझ्या भेटीचे आश्चर्य हे आहे की तुझ्या भेटीला येणाऱ्याचा जीवभाव तूं उरू देत नाहीस. जो वेगळेपणा दिसतो तो फक्त अविद्या उपाधिमुळेच दिसतो. अशा तऱ्हेचे तुझ्या दर्शनाचे शास्त्र तूं निश्चित करून ठेवले आहेस. वरील बोध सांगण्यालादेखील मला त्या पांडुरंगरायांनी वेगळे ठेवले नाही. असे निवृतीदास माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading