ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 807

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१० वे, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ८०७

तुझे पवाडे सांगतां तुजपुढें । मुक्तीची कवाडें उघडती ॥१॥ नाहीं जातिकुळ म्यां तुज पुसिलें । मन मावळलें देखोनिया ॥२॥ तुझें तुज पुसतां लाजिरवाणें । तरी हांसती पिसुणे प्रपंचाची ॥३॥ उगवितां भलें की नुगवितां सांपडलें । ज्ञानदेवो बोले निवृत्तीसी ॥४॥

अर्थ:-
हे श्रीकृष्णा, तुझ्यापुढे तुझी कीर्ति गाऊ लागलो म्हणजे मुक्तिची द्वारे मोकळी होतात. तुला पाहिल्याबरोबर तुझ्या ठिकाणच्या यातीकुळाचा विचार न करता तुझ्याठिकाणी माझे मन तल्लीन होऊन गेले. तुझ्या स्वरूपाचा विचार, तुला विचारू लागले असतां हा आतां देवाच्या नादी लागला असे म्हणून बहिर्मुख प्रापंचिक लोक माझ्याकडे बघून हसतात.अशी ह्या तुझ्या स्वरूप ज्ञानाकरिता खूप खटपट करावी लागते. पण मला मात्र ते ज्ञान श्रीगुरू निवृत्तिरायांच्या कृपेने सहजासहजी लाभले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading