ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.757

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७५७

चातकाची तृषा मेघे पुरविली । ब्रह्मस्तनी पान्हाईली बाईये वो ॥१॥ निवृत्तिप्रसाद माझ्या मुखी सूदला । प्रेमरसें धारा फुटल्या दोही पक्षी ॥२॥ बाप श्रीगुरू तेणें मज अफाविलें । अवघे ब्रह्म दाविलें ज्ञानदेवा ॥३॥

अर्थ:-

 ज्याप्रमाणे चातकाची तृषा मेघ पूर्ण करतो. त्याप्रमाणे ब्रह्मरूपीस्तनांच्या ठिकाणी पान्हावलेली. माझी श्रीगुरूनिवृत्तिमाऊली तिने पान्हावलेल्या ब्रह्मस्तनाचा पान्हा माझ्या मुखांत घातला. त्या स्तनातून प्रेमरसाच्या धारा दोन्ही बाजुला फुटल्या. धन्य धन्य श्रीगुरू निवृत्तिराय त्याने मला आनंदीत करून, परिपूर्ण ब्रह्मज्ञान करून दिले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

Leave a Reply