ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.755

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७५५

देखोनी पूजावया गेलें द्वैतभावो । तेथें एक उपदेशी श्रीगुरूरावो ॥१॥ द्वैतभावो नाशिला माझा द्वैतभावो नाशिला । पूजा उद्वंस केला तें ब्रह्ममय ॥२॥ रखुमादेविवरु देखण्या वेगळा देखिला । सगुण निर्गुण जाला बाईये वो ॥३॥

अर्थ:-

 जेंव्हा मी पूज्य पूजक भाव धरून ईश्वराचे पूजन करावयास निघालो तेंव्हा वाटेत श्रीगुरू भेटले. त्यांनी भेटल्याबरोबर मला आत्मज्ञानाचा उपदेश केला. तेंव्हा माझा द्वैतभाव नाहीसा होऊन गेला. त्यामुळे पूजा करण्याच्या दृष्टीने जी काही सामुग्री मी जमवली होती. तिचा विध्वंस होऊन ती सर्व ब्रह्मरूप झाली. याप्रमाणे दृश्य, द्रष्टाभावातीत असणारे रखुमाईचे पती जे श्रीविठ्ठल तेच सगुण व निर्गुण झाला आहेत. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading