ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.734

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७३४

सत्त्व रज तम प्रकृति अपारा । याही भिन्न प्रकारा हरिरया ॥१॥ दिसोनी न दिसे लोकीं व्यापारीं । घटमठ चाही हरि व्याप्त ॥२॥ स्वानुभवें धरी अनुभवें वाट । तंव अवचित बोभाट पुढें मागें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे न कळे याची लीला । ते निवृत्तीनें डोळां दाविली मज ॥४॥

अर्थ:-

सत्त्व, रज तम या गुणांनी युक्त अशी जी प्रकृति ती सर्व जगाला उपादान धरण आहे. त्या प्रकृतिहून वेगळा श्रीहरि आहे. हरि घटमठात व्यापक उलट असल्यामुळे तो सर्व जगांत भासमान आहे. पण आश्चर्य हे आहे की तो कोणास कोणत्याही व्यवहारांत दिसत नाही. त्याकरिता आत्मस्वरूपाच्या विचाराची वाट धर म्हणजे सहजगत्या कसलीही अडचण न येता तुझ्या मागेपुढे असा सर्वत्र तोच तुला दिसेल. या श्रीहरिची लीला कोणालाही कळणार नाही. पण माझ्या श्रीगुरू निवृत्तिरायांनी मात्र ती लीला माझ्या डोळ्याला प्रत्यक्ष दाखविली. माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading