ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.694

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६९४

काळा लपंडाई काळेरात्री खेळे । मी सवें वेधिली जाय काळ्याछंदें ॥१॥ काळे निळे हे अभ्र भासले । ऐसें रूप देखिलें निर्गुणाचें ॥२॥ ऐसा हा सांवळा माझिये दृष्टि माल्हाथिला । उजरूनि गेला हा विठ्ठलु गे माये ॥३॥ ऐसे भुलविले जाण काळेपणे आपणें । रखुमादेविवरू जाणे येर काहीं नेणें ॥४॥

अर्थ:-

काळीरात्री म्हणजे अविद्या रात्रीच्या काळोखात हा काळा म्हणजे शुद्ध श्रीकृष्ण लपंडाव खेळत आहे. मला परमात्मप्राप्तीचा वेध लागल्यामुळे मी त्या काळ्या श्रीकृष्णाच्या छंदाने त्याच्याकडे गेले. तिकडे गेल्यावर निर्गुण जो परमात्मा त्याचे काळ्या निळ्या आकाशाप्रमाणे सगुणरूप पाहिलें. असा हा सांवळा श्रीकृष्ण परमात्मा माझ्या दृष्टीत येऊन बसला. आणि माझी दृष्टि निवळ करून हा श्रीविठ्ठल परमात्मा गेला. अशा या काळ्या रूपांनी मला भूलवून टाकले. त्यामुळे रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांच्या शिवाय मी दुसरे कांही जाणत नाही. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading