ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.684

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६८४

तें अवघेंचि नव्हें अवघेंचि होय । अवघ्यावीण सोय आणिक असे ॥१॥ अवघे म्हणिजे व्योमाकार दिसे । त्याहुनी परतें असे गे माय ॥२॥ रखुमादेवीवरू परता पहावयां गेलें । परतें पराहूनि देखिलें गे माय ॥३॥

अर्थ:-

जगत् ब्रह्म नव्हे, पण सर्व जगत् ब्रह्मरूप आहे. कारण जगत् अध्यस्त आहे. म्हणून सर्व जगताहून परमात्म्याची स्वरूपस्थिती काही निराळीच आहे. आकाशादि जगत् त्याहून ते परब्रह्म निराळे आहे. रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांना पहावयाला गेले, तेंव्हा ते परेच्याही पलीकडे आहे असे दिसले. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading