ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.682

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६८२

एकांतींचे गुज पुसों गेलिये सये । मी माझी नाहीं त्यासी कीजे वो काये ॥१॥ ऐसी भेरी निवाडे सांगिजे कोणापुढें । मनासी सांकडे पडिलें रया ॥२॥ सुलभ सुकुमारु रुपे मनोहरू । रखुमादेविवरू परेही परता ॥३॥

अर्थ:-

त्या परमात्म्याच्या एकांतात मिळणाऱ्या सुखाचा मी अनुवाद कोणापुढे करावा. म्हणून मी मनाशी विचार करू गेले. तो माझ्या ठिकाणचा मीपणाही नाहीसा होऊन गेला. त्याला आता काय करावे. अशा परमात्म्याच्या भेटीविषयी झालेला निवाडा कोणापुढे सांगू. हे गुह्य सांगण्याचे मला मोठे संकट पडले. विचार केला तर भगवत्प्राप्ती फार सुलभ आहे. तो परमात्मा सुकुमार, नाजूक असून मोठा मनोहर आहे. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हे परावाणीच्या पलीकडे असल्यामुळे त्यांचे वर्णन करणे कठीण आहे. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading